या वर्षी मी आणि माझ्या आईने दिवाळीनंतर रोज आमच्या क्वार्टरच्या दारापुढे रांगोळ्या काढायला मोठ्या आवडीने सुरूवात केली. काही जमल्यात, काही फ़सल्यात सुद्धा. माझ्या बाबाने दररोज त्या रांगोळ्यांचे मोठ्या हौसेने फ़ोटो काढलेत. त्या सर्व रांगोळ्या आपल्यासमोर सादर करीत आहे. आपल्याला त्या आवडतील अशी अपेक्षा.