मी सोमलवार शाळेत शिकते. मी आता ५ वी त गेली. मागच्या वर्षी आमच्या शाळेला १०० वर्ष पुर्ण झाले. म्हणून गेल्या वर्षी आमच्या शाळेत खूपसे कार्यक्रम साजरे झाले. त्यात आम्ही सर्वांनी भाग घेतला.
मी शाळेच्या समारंभात जिजाबाई झाली होती.
आणि माझ्या मैत्रीणी शहाजीराजे, शिवाजी महाराज आणि मावळे झाल्या होत्या.
माझ्या मैत्रिणी खुप चांगल्या आहेत. त्यातल्या त्यात आम्ही आमच्या वर्गातल्या एका मुलाला "आजोबा" चिडवायचो. कारण त्याचा आवाज सुध्दा आजोबांसारखाच आहे. आणि तो पण आम्हाला "सडलेली कोथिंबीर" चिडवायचा.
आणखी एका मुलाला आम्ही "प्रियंका चोपरा" चिडवायचो. कारण तो आम्हाला वेडवाकडं काहीपण चिडवायचा. व तो प्रियंका चोपरा सारखा स्टाईलमधे बसायचा. आणि त्यावरुन आम्ही इतकी मजा करायचो.
तर आम्ही सगंळे ५ वी त गेलो. व आम्ही ४ थी सोडतांना सुध्दा खुप मजा केली. आता आमचे ५ वी चे क्लासेस होतात. म्हणुन आम्ही सर्व जण एकमेकांशी भेटु शकतो. आता तर आज आमची शाळा संपली. आता परवा म्हणजे ३० तारखेला आमचा रिझल्ट आहे. ज्यांचा ज्यांचा वाढदिवस उन्हाळ्यात येतो. त्यांनी त्यांनी शेवटच्या दिवशी आपला वाढदिवस शाळेत साजरा केला. त्याच दिवशी आमच्या ४ थ्या अ चा फोटो काढला.
तेव्हा सगंळे खुप चांगले दिसत होते. माझी एक मैत्रिण इतकी गोरी आहे कि ती फोटोमध्ये खुप चांगली दिसत होती. तिच नाव आहे राधा. माझ्या सर्वांत बेस्ट फ्रेंडस आहे्त राधा, सुकीर्ती, श्रेया, मैथिली, लक्षिता, मधुरिका आणि भावना .
आम्ही आता पूढच्या वर्षी कोण कोण एकत्र येऊ ते आम्हाला कोणालाच माहित नाही.

No comments:
Post a Comment