Monday, October 7, 2013

माझी शालेय सहल

दि. ३०/९/२०१३ व १/१०/२०१३

स्थळे.  ३०/९/२०१३ ला : सांगोला- कोल्हापुर- पन्हाळा- कोल्हापुर(शाहु पॆलेस, अंबिका मंदिर)- सातारा मार्गे सज्जनगड    
सज्जनगडला मुक्काम

१/१०/२०१३ ला : सज्जनगड- कासपठार- गोंदवले- सांगोला

३०/९/२०१३

मी पहिल्यांदाच दोन दिवसांच्या सहलीला चालले होते. आदल्या दिवशी तर मला एवढी उत्सुकता होती, कि उद्या काय होईल आणि काय नाही? आदल्या दिवशी तर मी सर्व सामान एकदा परत बघितले. दुसय़ा दिवशी लवकर जायचे होते म्हणुन मी लवकर झोपले.

दुसय़ा दिवशी पहाटे साडे चारला (४.३०) निघायचे होते. आम्ही सर्व लवकर आलो पण काही मुले उशीरा आली. त्यामुळे आम्हाला निघायला उशीर झाला. आणि पाचवी व सहावी अशी सहल जाणार होती. गंमत म्हणजे आमच्या वर्गातला एक मुलगा बस निघाल्या नंतर आला. आणि एक मुलगी तर आलीच नाही. त्यामुळे आम्हाला सांगोल्यातुन निघायला साडे पाच (५.३०) वाजले.

दोन दिवसांची सहल असल्यामुळे आम्ही एस.टी. च्या बसनी गेलो. सांगोल्यातुन निघताना उजाडलही नव्हतं व डोळ्यात झोप असल्याने अर्धी मु्ले बसमध्ये स्वप्न पाहत होती. काही जणांना सवय असते, कि कुठल्याही गाडीमध्ये बसलं रे बसलं कि काहीतरी खायचचं. त्यामुळे अर्धी मु्ले आपल्या आईनी आपल्यासाठी खाउ काय दिलाय ते पाहत होते. आपल्या आईनीच नाही तर दुसय़ांच्या आईनी काय दिलय हे सुद्धा पाहत होते. व काही मुले गाण्याच्या भेंड्या खेळत होते. मी सुद्धा त्यात शामिल झाले. आमच्या सोबत एकुण ३ मॆडम व ३ सर होते. बघता बघताच कोल्हापुर आले. पण आम्ही कोल्हापुरला न थांबता सरळ पन्हाळ्याला गेलो. 

पण आम्ही कोल्हापुरला न थांबता सरळ पन्हाळ्याला गेलो. तेव्हा उजाडलं होतं. आम्ही पन्हाळ्याला उतरुन तेथील किल्ले पाहिले त्यासाठी आम्ही एक गाईड केला होता. पहिल्यांदा आम्ही एक गुप्त मार्ग पाहिला. त्याची माहिती आम्हाला कळली. तो राजवाडा फार जुना होता. व सतत येणारा पाऊस त्यामुळे त्या राजवाड्यावर फार शेवाळ जमले होते. मग आम्ही तिथल्याच एका बागेत जेवायला बसलो. मी बटाट्याची भाजी, पोळी व जिरा राईस आणला होता. जेवण झाल्यावर आम्ही बसमध्ये बसून वापस कोल्हापूरात आलो. तेथे फार गर्मी होती. व उशीरही फार झाला होता. त्यामुळे आम्ही अंबिका मंदिरात गेलो.व शाहु पॆलेसचा बेत आम्ही रद्द केला. आम्ही रंकाळा तलाव पण पाहिला. तेथुन आम्ही निघालो व पहाता पहाता मला व माझ्या मैत्रिणींनाच झोप लागली. सर्व झोपलेल्या विद्यार्थांचे सर फोटो काढत होते त्यात आमचा सुद्धा फोटो आला. जाग आली तेव्हा कराड आलं होतं.

सज्जनगडावर पोहोचल्यावर आम्हाला पाय-य़ा  चढायच्या होत्या. पण आम्हाला कुठल्याही सर किंवा मॆडमनी सांगितलं नाही की किती पाय-य़ा  आहेत. कारण मग आम्ही चढायच्या आधीच दमलो असतो. एकुण २५० पाय-य़ा  होत्या. गड चढल्यावर आम्ही फार दमलो. आम्ही तेथे मुक्काम करणार होतो. म्हणुन मुलींसाठी व मुलांसाठी वेगळा हॊल घेतला. आम्ही तेथे आमच्या बॆग ठेवुन हातपाय धुवायला गेलो. पाणी फार गरम होतं. नंतर हॊलमध्ये वापस येऊन आम्ही आंथरुण टाकली. व सर्वांनी स्वेटर घातले. तेथे फार थंडी होती. कारण ते ठिकाण समुद्रसपाटीपासुन फार उंच होतं. नंतर सर्व मुली व मॆडम मिळुन मंदिरात गेलो. तेथिल दर्शन घेउन आम्ही तेथे बसलो व थोड्याच वेळात आरती सुरु झाली. व मुलं सुद्धा आली . आरती संपल्यानंतर दासबोध वाचन झाले. पण सर्वांना फार भुक लागली होती. थोड्याच वळात आम्हाला प्रसादाला नेले. त्यादिवशी एकादशी होती. त्यामुळे तेथे भगर, आमटी, ताक हे पदार्थ होते. काही मुलांना ते आवडले नाही. पण मला तो प्रसाद फार आवडला. नंतर आम्ही हॊल मध्ये जाउन शांततेने झोपलो. 

१/१०/२०१३

सकाळी लवकर उठायचे ठरले. सहा वाजता निघायचे ठरले सर्व मुलांचे लवकर झाले. पण आम्हा मुलींना पावणे सहा वाजता उठवलं. मग आम्ही सर्वांनी लवकर आवरलं. मुलींची आंघोळ झाल्यावर सर्व मुलामुलींना तेथील खरेदी करायला पाठवलं. मी तेथे एक किचेन व एक मनाचे श्लोकांच पुस्तक घेतलं. ते पुस्तक फार लहान आहे. 




आम्ही तिथुन साडे सहाला निघालो. माझे पिण्याचे पाणी संपले होते म्हणुन निघताना मी व माझ्या मैत्रिणीनी तेथील पिण्याचे पाणी भरुन घेतले. गड उतरुन खाली आल्यावर माझ्या एका मैत्रिणीनी तेथे आईसक्रिम घेतलं व खात बसली. एवढ्या थंडीत ती आईसक्रिम खात होती. सज्जनगडहुन निघाल्यावर आम्ही गाण्याच्या भेंड्या खेळत गेलो. बघता बघताच कासपठार आलं. तेथे आल्यावर आम्हाला पोहे दिले. ते खाउन आम्ही खाली उतरलो. कासपठार बघायला गेलो. 

तेथे आल्यावर आम्हाला पोहे दिले. ते खाउन आम्ही खाली उतरलो. कासपठार बघायला गेलो. आत शिरल्या शिरल्या आम्ही पाहीलं तर आम्हाला ते बोअर वाटलं कारण सगळीकडे गुलाबी फुलं. गुलाबी फुलं असले तरी ठीक पण इथे तर काही माणसांनी त्या फुलांना चिरडुन टाकले. काही फुले (फुलांची झाडे) जळुन गेली. आम्ही ते पाहायचं सोडुन आत गेलो. जसजस आत जाउ लागलो तसतस  तेथे फार रम्य होत जात . आम्ही ३० का ३२ फुलांचे प्रकार पाहिले. मला नावं नाही आठवत पण काहींची नावं मला आठवतात. त्यातलं एक मिकीमाऊस फुल ते सेम टु सेम मिकीमाऊससारखं दिसायचं. ते पिवळ्या रंगाचं होतं.आणि आम्ही डोनाल्ड डक फुल सुद्धा पाहिलं. ते सुद्धा पिवळ्या रंगाचचं  होतं. आम्ही तेथे फार मज्जा केली. पण फार फिरलो सुद्धा त्यामुळे आमच्या अंगात आता आणखी चालण्याचं त्राणचं नव्हतं. ते सर्व मॆडमला व सरांना कळलं त्यामुळे मग आम्ही तेथेच बसून गाण्याच्या भेंड्या खेळलो. तेथुन आम्ही कासतलाव पहायला गेलो. कासतलाव फार सुंदर आहे. 

नंतर आम्ही बसमध्ये बसून गोंदवलेला जायला निघालो. लवकरचं सातारा आलं. माझ्या एका मैत्रिणीच्या आजीच्या मैत्रिण तेथे आहेत. त्यांच स्वतःचं तेथे (साता-य़ाला) एक हॊटेल आहे. तेथे आम्ही जेवायला गेलो. जेवण झाल्यावर त्यांनी आम्हाला सर्वांना एकएक पणती दिली. त्या त्यांनी घरी स्वतःहुन बनवल्या होत्या. नंतर आम्ही गोंदवलेला जायला निघालो. गोंदवलेला आम्ही साडे चार वाजता पोहचलो. तेथे दर्शन झाल्यावर सर्वांनी खरेदी केली. मी माझ्या जवळ नेहमी काउंटर ठेवते. व ते काउंटर मी आधिच गोंदवलेहुन आणलं होतं. ते पाहुन माझ्या मैत्रिणींनी सुद्धा तेथे काउंटर खरेदी केलं. तेथुन आम्ही निघालो. व सरळ सांगोल्यात पोहचलो. 

मला ही सहल फार आवडली.  


No comments:

Post a Comment