प्रास्ताविक :
माझी मुलगी चि. मृण्मयी. तिला सख्खे भावंड नसल्याने तिच्या भावाची भूमिका मलाच पार पाडावी लागते. मी माझा ब्लॉग लिहितोय म्हणजे नक्की काय करतोय हे तिला कळायला लागल्यानंतर तिलापण तिचा स्वतःचा ब्लॉग हवा होता. मग सुरुवातीला तिला लेखन करायला लावून ते इथे टाकले.
यंदाच्या तिच्या वाढदिवसाला तिला दिलीप प्रभावळकरांचे " बोक्या सातबंडे " चे सगळे भाग भेट मिळालेत आणि तिने ते वाचूनही काढलेत. दिवाळीच्या सुट्टीत एक दिवस तिच्या मनाने घेतले की बोक्या सारखे एखादे पात्र आपणही निर्माण करावे आणि तिने ही कल्पना मला सांगितली. मी सुद्धा प्रोत्साहन दिले आणि सत्य आणि कल्पिताचा वापर कर अशी टीप पण दिली.
खालील कथा ही पूर्णपणे तिच्या कल्पनेच्या आणि अनुभवांच्या आधारे लिहिलेली आहे. झंपड हे तिच्या कल्पनेतले पात्र आणि ह्यातली झंबू म्हणजे माझ्या धाकट्या भावाची मुलगी आहे. (रेणुका श्रीकांत किन्हीकर ) तिच्या या उद्योगाचे मला फारच कौतुक वाटले. - प्रा. राम प्रकाश किन्हीकर
झंपड मोठी होते-१
झंपड ही मुंबईत राहणारी एक मुलगी आहे. ती तिच्या आई,
बाबा, आजी व तिच्या लहान बहीणीसोबत राहते. एकदा रविवारच्या दिवशी आईला एक फोन येतो. आई तो फोन
उचलते.
आई:- "हॆलो! कोण बोलतंय?"
फोनवरील व्यक्ती:- "मी पुण्याहुन पल्लवी बोलते."
आई:- "बोल ताई! काय म्हणतेस?"
पल्लवी ताई:- "मी ठिक आहे. तु कशी आहेस? झंपड आणि
झंबू काय म्हणते?"
आई:- "काही नाही. दिवसभर दंगा करत असतात. बरं!
फोन कशासाठी केला होतास?"
पल्लवी ताई:- "माझ्या दिराचं लग्न आहे. तु यावे
आशी आमची ईच्छा आहे."
आई:- "हो नक्की येईल. कधी आहे लग्न?कुठे?"
पल्लवी ताई:- "चार डिसेंबरला शाहु गार्डन येथे
आहे. तुला आता पत्रिका येईलचं. येशील ना लग्नाला?"
आई:- "येईल. नक्की येईल. बरं ठेवते.
पल्लवी ताई:- " हो. ठेव."
आई फोन ठेवते व बाबांकडे जाते.
बाबा:- "कोणाशी बोलत होतीस एवढा वेळ?"
आई:- "ताईचा फोन होता. तिच्या दीराचं लग्न ठरंल."
बाबा:- ""कोण तिचा दीर?"
आई:- "असं काय करतायं? प्रसादचं लग्न ठरलयं.
बाबा:- "अरे वा! वा! वा! छान झालं की. कधी ठरंलय
लग्न?"
आई:- "४ डिसेंबरला शाहु गार्डनमध्ये."
बाबा:- "जाउया आपण. अगं, आजची किती तारीख आहे गं?"
आई:- "आजची न २ तारीख आहे.
बाबा:- "परवाचीच ४ तारीख."
तेवढ्यात झंपड धावत धावत येते.
झंपड:- "आई गं झंबूला बरं नाही. मगापासुन सारखी
खोकलत आहे. जरा बघ बरं."
आजी:- " अगं बाई ! काल एवढं थंड आईस्क्रिम खाल्ल
ना म्हणुन. मी सांगत होते थंड खाऊ नये"
झंपड:- " अगं आजी आईस्क्रिम थंडच खायचं..........."
बाबा:- " बरं आपण झंबूला बघायला जाउया."
आई:- " आपण लवकरात लवकर हिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया."
आजी:- " नही बाई माझे पाय दुखतायेत. तुम्ही जाऊन
या."
बाबा, आई, झंपड व झंबू दवाखान्यात गेले.
डॉक्टर:- " आईस्क्रिम मुळे काही झाले नाही; पण
२ दिवस कुठेही जाऊ नका."
सर्वजण ऒषधे
घेऊन घरी आले.
बाबा:- " आता लग्नाला कसं जायचं?"
झंपड:- " कुणाचं लग्न बाबा?"
बाबा:- " अगं तो प्रसाद दादा आहे ना त्याचं लग्न."
झंपड:- " प्रसाद दादा नाही प्रसाद काका."
बाबा:- " हो! हो! काकाचं"
झंपड:- " खरं च! आपण जाऊया ; पण माझी इच्छा नाही यायची.
मी त्याला नंतर भेटील."
आजी:- " चालेल. मी आणि झंपड, आम्ही दोघी थांबून
रेणुकाची काळजी घेऊ. तसं पण माझा पाय आजकाल रोज दुखतो."
आई:- " चालेल. आम्ही दोन दिवस न राहता एका दिवसात येऊ. "
बघता बघता दोन दिवस झाले व आई-बाबांची गावाला जायची
तयारी सुरु झाली. बेग भरण झाल्या. व झंपडच्या आईनी झंबूची व आजीची काळजी कशी घ्यायची
ते सांगितले.
त्यादिवशी झंपडनी सुट्टी घेतली होती. व आजीला कुठेतरी
जायचं होतं. बहुतेक तिला त्या भजनी मंडळातचं जायचं होतं व ते भजनी मंडळ समोरच्या जोश्यांकडे
आज भरणार होतं म्हणुन ती २ तासांसाठी जाणार होती. जाता जाता ती म्हणाली.
आजी:- " हे बघ मनु मी २ तास समोर जाउन येते. आणि
समोरच्या मधुराला पाठवते. तु कुठेही जाउ नकोस."
असं म्हणुन आजी समोर जाते.
आजी:- " अगं मधुरा झंपड आणि रेणुका तुझी
वाट पाहत आहे. जा बरं"
मधुरा :- " आजी ही रेणुका कोण आहे?"
आजी:- " अगं अशी काय करतेस? रेणुका म्हणजे
झंबु. मी तीला लाडानं रेणुका म्हणते. जा आता."
मधुरा झंपडच्या घरी जाते.
झंपड मोठी होते-२
मधुरा झंपडच्या घरी जाते. झंपड झंबुसाठी टि.व्ही. लावुन
देत असते. मधुरा गेल्यागेल्या एकदम म्हणते "काय चाललय?" त्यमुळे झंपड एकदम
घाबरते. व घाबरुन टि.व्ही.चा प्लगचं काढुन टाकते. टि.व्ही. बंद झाला म्हणुन झंबू रडायला
सुरवात करते. मग झंपडनी लगेच टि.व्ही. सुरु केला. मग झंबूचे रडायचे थांबले.
झंपड-:" अगं मधुरा बाहेर का उभीस आत ये ना."
मधुरा आत येते.मग त्या सगळ्या जणी टि.व्ही. बघत बसल्या.थोड्या
वेळाने,
मधुरा-:"आपण तुझी डॊल खेळुया का?"
झंपड-:" हो. चल ना आत."
त्या दोघी आत खेळत होत्या. तेवढ्यात झंबुचे आवडते कार्टुन
म्हणजेच टॊम ऎण्ड जेरी संपले आणि तिला न
आवडणारे कार्टुन सुरु होते. त्यामुळे ती टि.व्ही. रिमोटनीच बंद करुन झोपायला आत गेली.
थोड्या वेळानंतर मधुराला कळलं की टि.व्ही.चा आवाज बंद झाला आहे. पण झंपड खेळण्यात दंग
होती. मग मधुरानी झंपडला सांगितलं मग दोघी हॊलमध्ये गेल्या तर झंबू तिथनं गायब आणि
हवेमुळे बाहेरचं दार उघडं मग झंपडला वाटलं की झंबू दार उघडुन आजीला शोधायला गेली.
कारण झंबू ५ वर्षाची होती तीला सगळं कळत होतं. म्हणुन
ती घाबरली आणि बाहेर जाउन पाहिलं तर तिथेही झंबू नव्हती. मग मधुरा तिच्या खोलीत गेली.
तर तिथे झंबू शांततेने झोपली होती.
अर्ध्या तासानं झंबू उठली आणि म्हणाली-:" ताई मला
कडु कडु ऒषध दे. "
झंपड-:"नाही गं आता नाही प्यायचं ऒषध अजुन अर्धा
तास आहे"
झंबू रडणार तेवढ्यात झंपड टि.व्ही लावते. थोड्या वेळाने
झंबू म्हणते-:"मला फार घाम आलाय पाघरुणात बशुन बशुन"
झंपड-:"आता काय आंघोळ करायची आहे ?"
झंबू क्षणार्धात म्हणे-:"हो चालेल."
मग झंपडनी झंबूला आंघोळ घालुन दिली. आंघोळ झाल्यावर
झंबुला ताप आला. मग झंपडनी झंबूच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या आणि तिला झोपवलं. आई-बाबा रात्री आले.
सकाळी पाहीलं तर झंबू पुर्ण बरी.
आईनी विचारलं-:"अरे ही एवढी बरी कशी काय? काल तर
ताप होता."
मग झंपडनी सर्व सांगितलं तर सर्वांनी तिची पाठ थोपाटली.
आणि बाबा म्हणाले
"झंपड आता तु खरचं मोठी झालीस."
No comments:
Post a Comment