झंबू आता मोठी झाली होती. ती आता दुसरीच्या वर्गात उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यावर जाणार होती. तिने पहिलीत पूर्ण वर्गातून पहिला क्रमांक पटकावला होता. तर झंपड आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनंतर सातवीच्या वर्गात जाणार होती. खरंतरं झंपडने पहिल्या सारखा पहिला कमांक पटकावला नव्हता तरं तिचा सहावीत दुसरा कमांक आला होता. झंबूने पहिल्याच वर्षी पहिला क्रमांक आणल्यामुळे घरचे सर्व (आई,बाबा आणि आजी) झंपडला मुद्दामून चिडवत तर कधी रागवत. एकदा तर म्हणाले," बघ जरा तुझ्यापेक्षा झंबु किती हुशार आहे. काहीतरी शिक तिच्याकडनं " असं म्हणलं की झंबूला मजा वाटे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु होवुन एक महिना सुद्धा झाला नव्हता तेव्हा एकेदिवशी आतल्या खोलीमध्ये झंबू आणि झंपड खुप दंगा करत होत्या तेव्हा आई पेपर वाचत असलेल्या बाबांना म्हणाली," ऐकताय का? मला झंबुची काळजी वाटते. " बाबा पेपर खाली करुन आईला विचारतात," काय गं? कसली काळजी वाटतेय तुला? "
आई, " मागच्या वेळेस काय घडलं होतं माहित आहे ना तुम्हाला ? "
बाबा, " काय बाबा, काय घडलेलं? "
आई, " अहो! मागच्या वेळेस उन्हाळ्याच्या सुट्ट्यात तिने कंटा्ळा येतोय म्हणुन माझं डोकं खाल्ल होतं. आपण तिला या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कसल्यातरी क्लासला पाठवलं पाहिजे. "
आजी, " मला तरी वाटतं की तिला गाण्याचा क्लास लावावा. " आजीला गाणे फार आवडायचे ना म्हणुन ती असं म्हणाली होती.
तेवढ्यात आई म्हणाली, " तिला जर आपण बॆडमिंटनचा क्लास लावला तर कसं होईल ? "
बाबा, " त्यापेक्षा आपण तिला स्विमींगचा क्लास लावणे अधिक उपयोगाचे ठरेल "
झंपड बाहेर येउन म्हणते, " आपण जर तिला बॊक्सिंगच्या क्लासला लावु. म्हणजे एखाद्यावेळेस ती मेरी कोम झाली पाहिजे. नाहितर हे जर आपण तिलाच विचारलं तर ? "
झंबु लगेच बाहेर येते आणि म्हणते, " मी सगळं ऐकलं आता मला गाण्याच्या क्लास ला जायला आवडेल "
झंबुला नंतरच्याच दिवशी झंपड्ने कॊलिनीतल्या भारती काकूकडे नेले. त्या गाण फार छान शिकवायच्या. त्यांच्याकडे झंपड्ने झंबूचे नाव नोंदवले आणि १५०रु. शुल्क भरले आणि झंबूला त्याच दिवसापासुन क्लास लावला. तिथे ती फार रमली.
१ जूनला झंबुची गाण्याच्या क्लासची परिक्षा होती. आणि बरोबर ३० मे ला तिने बाजूच्या माधुरीच्या वाढदिवसाला जाउन तेथील केक खाल्ला, आणि तिचा घसा बसला. दुसया दिवशी तिला औषधे देउन घसा बरा करण्याचे सर्वांचे प्रयत्न चालु होते. संध्याकाळ पर्यंत तिचा घसा ब-यापैकी बरा झाला.तेव्हा ती बाबांना म्हणाली, " मला समोसे खायचे आहेत. "
बाबा म्हणाले, " आज नाही ग, उद्या तुझी परीक्षा आहे आणि आत्ताच घसा बरा झाला ना. तुला समोसे आज नाही मिळणार. " असं बाबांनी म्हटल्यावर झंबुचा चेहरा एवढासा झाला.
दुस-या दिवशी झंबुची परीक्षा छान झाली. पण तिचा थोडासा आवाज बसला होता. त्यामुळे तिचा या परीक्षेत मात्र ३रा नंबर आला. घरी आल्यावर तिला फार वाईट वाटत होते. तेव्हा आजी म्हणाली, " झंपड शिक जरा काही लहान बहिणीकडनं. "
झंबु, " आजी पण तर माझा तिसरा नंबर आला "
आजी, " अगं पण तुझा घसा बसल्यावरसुद्धा तु तिसरा क्र्मांक पटकावला. झंपड तर एवढं पण नाही करु शकत."
तेवढ्यात दारावरची बेल वाजते. झंपड दार उघडते तर घरातल्या सर्वांना खमंग वास येतो पाहतोतर काय ! बाबांनी त्यांच्या हातात एक पिशवी पकडली असते आणि त्यात गरमागरम समोसे असतात. हे पाहिल्यावर झंबूतर आनंदाने उड्याच मारायला लागते.