Saturday, April 28, 2012

माझा ४ था अ

मी  सोमलवार  शाळेत  शिकते.  मी  आता  ५  वी  त  गेली.  मागच्या  वर्षी  आमच्या  शाळेला  १००  वर्ष  पुर्ण  झाले. म्हणून  गेल्या वर्षी  आमच्या  शाळेत  खूपसे  कार्यक्रम  साजरे  झाले. त्यात  आम्ही  सर्वांनी  भाग  घेतला.  




मी शाळेच्या समारंभात जिजाबाई झाली होती.






आणि माझ्या मैत्रीणी शहाजीराजे, शिवाजी महाराज आणि मावळे झाल्या होत्या.

माझ्या  मैत्रिणी  खुप  चांगल्या  आहेत.  त्यातल्या त्यात आम्ही  आमच्या  वर्गातल्या  एका  मुलाला  "आजोबा"  चिडवायचो.  कारण  त्याचा  आवाज  सुध्दा  आजोबांसारखाच  आहे. आणि  तो पण  आम्हाला  "सडलेली  कोथिंबीर"  चिडवायचा.  

आणखी एका मुलाला  आम्ही "प्रियंका  चोपरा"  चिडवायचो.   कारण  तो  आम्हाला  वेडवाकडं  काहीपण  चिडवायचा.  व  तो  प्रियंका  चोपरा  सारखा  स्टाईलमधे  बसायचा.  आणि  त्यावरुन  आम्ही  इतकी  मजा  करायचो.  

तर  आम्ही  सगंळे  ५  वी  त  गेलो.  व  आम्ही  ४ थी  सोडतांना  सुध्दा  खुप  मजा  केली.  आता  आमचे  ५ वी चे  क्लासेस  होतात. म्हणुन  आम्ही  सर्व  जण  एकमेकांशी  भेटु  शकतो.  आता  तर  आज  आमची  शाळा  संपली.  आता  परवा  म्हणजे  ३०  तारखेला  आमचा  रिझल्ट  आहे.  ज्यांचा  ज्यांचा  वाढदिवस  उन्हाळ्यात  येतो.  त्यांनी त्यांनी  शेवटच्या  दिवशी  आपला  वाढदिवस  शाळेत  साजरा  केला. त्याच दिवशी  आमच्या ४ थ्या  अ चा  फोटो  काढला. 



तेव्हा   सगंळे  खुप  चांगले  दिसत  होते.  माझी  एक  मैत्रिण  इतकी  गोरी  आहे  कि  ती  फोटोमध्ये  खुप चांगली  दिसत  होती. तिच  नाव  आहे  राधा.   माझ्या सर्वांत  बेस्ट फ्रेंडस  आहे्त राधा, सुकीर्ती, श्रेया, मैथिली, लक्षिता, मधुरिका आणि भावना .

आम्ही आता  पूढच्या  वर्षी  कोण कोण  एकत्र  येऊ ते आम्हाला  कोणालाच  माहित  नाही.                               



Tuesday, April 24, 2012

माझी सायकल

आम्ही नवीन घरी येत असतानां ट्रक निघणार तेवढ्यात मला आठवले की मी माझी सायकल ट्रकमध्ये टाकायची विसरली मग मी माझ्या बाबाला सांगून ट्रकमध्ये सायकल टाकायला लावली. आणि नवीन घरी आलो. आल्यावर माझी सायकल खुपच बेकार झाली होती. आणि ती सायकल काही दिवसांनी आम्ही दुरूस्त केली.


मग दुसया दिवशी मी ती सायकल घेऊन बाहेर आली माझ्या आईने मला मागुन पकडले होते. पण मला काही कळतच नव्हतं काय करू ते.? पण कशीबशी मी ती सायकल त्यादिवशी चालवली.


त्या नंतरच्या दिवशी मी १,२, १,२  पायडल मारले.


तिसया दिवशी मी ३,३ पायडल मारले. व चॊथ्या दिवशी मी हळूहळू चालवत चालवत पूर्ण शिकली. व आज मी पूर्ण सायकल शिकलेली आहे.


खरंतर मला तुम्हा सर्वांना मी सायकल चालवतानाचा व्हिडीओ दाखवायचा होता पण काल आम्ही शुटींग करायलाच विसरलो. असूदेत. पुन्हा कधीतरी अपलोड करेन.



Sunday, April 22, 2012

माझा वाढदिवस आणि माझे संकल्प.

काल माझा तिथीने वाढदिवस होता. मी सकाळी उठल्यावर मला आईने व बाबाने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तेव्हा माझी शाळा सुरु होती. आमच्या शाळेत वाढदिवसाच्या दिवशी नवीन कपडे घालुन चॊकलेट वाटतात. मी ही शाळेत जाऊन वाढदिवस केला.

त्यादिवशी वाढदिवसा निमीत्त आमचे बापुराव महाराज व मायबाई महाराज यांना अभिषेक होता. त्यामुळे माझे बाबा मला शाळेत सोडुन तेथे गेले. शाळा सुटल्यावर माझे बाबा मला घेउन घरी गेले. नंतर मी, बाबा व आई आम्ही तिघही दर्शनाला महराजांकडे गेलो.

आम्ही मेहूण बोलावले होते. त्यांना घेउन आम्ही घरी आलो. त्या सर्वांचे जेवण झाले. व त्यांना सर्वांना घरी सोडून आम्ही थोडावेळ तेथे बसलो.


मग माझा श्रीकांत काका केक घेउन घरी आला.

आम्ही बाहेरून आईसक्रीम आणले होते. काका यायच्या आधी मी नवीन कपडे घालुन तयार झाली. व आईने मला ओवाळले. मग काका व रेणुका आल्यावर आम्ही केक कापला व सर्वांनी तो खाल्ला मग माझ्या आईने आईसक्रीम आणले.





माझी बहीण खुप लहान असल्याने ती २,२ चमच्यांनी आईसक्रीम खात होती. व खुप सांडवत होती.



मग ते थोड्यावेळाने घरी गेले. मी पण आपल्या रूम मध्ये जाउन झोपली. मग थोड्यावेळाने आई व बाबाही येउन झोपले.      


मी सुट्यांमध्ये काय करणार आहे. (माझे संकल्प)

१९ एप्रिल २०१२ ला माझा तिथीनी वाढदिवस होता. त्यानंतर मी १० वर्षाची झाली. तेव्हा मी ठरवले की मी सकाळी लवकर उठेन. मग मी खुप पुस्तक वाचेन. मी सायकल शिकेल. चेस, बॆडमिंटन, कॆरम अशे वेगवेगळे खेळ खेळीन. व सर्वांशी नम्रपणे वागीन.